टवाळखोरांवर निर्भया पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:05+5:302021-02-05T06:39:05+5:30

भरोसा सेलच्या पथकाने शनिवारी शहरातील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला भेट देऊन विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी ...

Nirbhaya Pathak's look at the robbers | टवाळखोरांवर निर्भया पथकाची नजर

टवाळखोरांवर निर्भया पथकाची नजर

भरोसा सेलच्या पथकाने शनिवारी शहरातील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला भेट देऊन विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी देशमुख बोलत होत्या. यावेळी पथकातील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, पोलीस नाईक सुलभा आवटी, अनिता विधाटे, कॉस्टेबल अंकुश भोसले, आसिफा शेख, संस्थेचे अध्यक्ष नजीर अहमद ऊर्फ नज्जू पहेलवान, प्राचार्य मोहम्मद खलील, आसिफ शेख आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाल्या कोरोनानंतर शहरातील शाळा, विद्यालये सुरू झाले आहेत. मुलींबाबत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्यालय परिसरास पथक अचानक भेट देऊन लक्ष्य ठेवत आहे. मुलींना त्रास देणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झालेले आहे.

संस्थेचे अध्यक्ष नजीर अहमद म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळेने विविध उपाययोजना केल्या असून, शासन नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांची विशेष काळजी या महामारीच्या परिस्थितीत आम्ही घेत आहोत.

फोटो ३१ उपक्रम

ओळी- चाँद सुलताना विद्यालयात भरोसा सेलच्या पथकाने भेट दिली. यावेळी संस्थेच्यावतीने उपनिरीक्षक पल्लवी देशमुख- उंबरहंडे यांचे स्वागत करण्यात आले.

Web Title: Nirbhaya Pathak's look at the robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.