भिंगार येथे जुगार अड्यावर छापा : नऊ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:06 IST2019-03-19T13:05:20+5:302019-03-19T13:06:03+5:30

सोमवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीसांनी मुकुंदनगर येथील नशेमन कॉलनीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून ९ जुगाऱ्यांना अटक केली़

Nine arrests in gambling in Bhangar | भिंगार येथे जुगार अड्यावर छापा : नऊ अटक

भिंगार येथे जुगार अड्यावर छापा : नऊ अटक

अहमदनगर : सोमवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीसांनी मुकुंदनगर येथील नशेमन कॉलनीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून ९ जुगाऱ्यांना अटक केली़ यावेळी जुगार क्लब चालविणारा गफार वजीर शेख हा फरार झाला़
कारवाईदरम्यान पोलीसांनी क्लबमधून १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांमध्ये किरण भगतराम बहुगुणा, अशोक किसनदास दुगड, अंकुश रामभाऊ गोरे, अर्शद आय्युब शेख, साजिद इब्राहिम पठाण, उत्तम हेमंत मोहिते, बाबू हरी भामीने, अय्याज इब्राहिम लाला बशीर शेख यांना ताब्यात घेण्यात आले़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलीस ठाण्याचे निरिक्षक शंकरसिंग रजपूत, सहाय्यक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस हेड कॉस्टेबल रमेश वराट, मैनुद्दीन शेख, राजेंद्र सुद्रिक, राहुल द्वारके, मोहिनी कर्डक यांनी ही कारवाई केली़

Web Title: Nine arrests in gambling in Bhangar