संगमनेरात दोन दिवसात नऊ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:19 IST2020-05-09T22:16:12+5:302020-05-09T22:19:48+5:30
संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गत दोन दिवसांत नऊने वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा आता १७ वर गेला आहे.

संगमनेरात दोन दिवसात नऊ बाधित
अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गत दोन दिवसांत नऊने वाढला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा आता १७ वर गेला आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एक व्यक्ती दवाखान्यात उपचार सुरु असताना मयत झाली होती. ही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा खासगी प्रयोगशाळेचा अहवाल होता. शनिवारी शासनानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. शनिवारी धांदरफळ येथील ३५ वर्षीय तरुणालाही कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे धांदरफळ गावातील बाधितांची संख्या मयतासह आठवर पोहोचली आहे. याशिवाय संगमनेर शहरातील एक महिलाही बाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी आला होता. यापूर्वी संगमनेरात आठ कोरोनाबाधित होते. मात्र ते सर्व उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेले आहेत. प्रशासनाने धांदरफळ, संगमनेर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहे. शनिवारी धांदरफळला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वत: भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.