निमगाव वाघात ‘एक मूल-एक झाड’

By Admin | Updated: June 30, 2016 01:17 IST2016-06-30T01:07:39+5:302016-06-30T01:17:32+5:30

अहमदनगर : तालुक्यातील निमगाव वाघा येथे दोनशे झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. त्यांच्या संकल्पाला मूर्त रुप देण्यासाठी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने ग्रामस्थांना दोनशे झाडे दिली.

Nimgaon Beach 'one child-one tree' | निमगाव वाघात ‘एक मूल-एक झाड’

निमगाव वाघात ‘एक मूल-एक झाड’


अहमदनगर : तालुक्यातील निमगाव वाघा येथे दोनशे झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. त्यांच्या संकल्पाला मूर्त रुप देण्यासाठी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने ग्रामस्थांना दोनशे झाडे दिली. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाडे लावून करण्यात आला. अन्य ठिकाणी खड्डे घेण्याचे काम सुरू आहे.
मंगळवारी निमगाव वाघा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष संजय ताथेड, प्रकल्प प्रमुख विनोद बोथरा, सचिव अनिल अनेचा, अमित मुथ्था, देवकिसन मणियार, निमगाव वाघाचे सरपंच दत्तात्रय डोंगरे, उपसरपंच शंकर गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय डोंगरे, अंकुश आतकर, भाऊसाहेब कदम, अंबादास शिंदे, अण्णा जाधव, मुख्याध्यापक रामदास आडसुरे, उपमुख्याध्यापक छाया चत्तर, शिक्षिका नंदिनी खोसे, सरस्वती गुंड, अर्चना नवले,विजय शिंदे उपस्थित होते. यावेळी शाळेच्या परिसरात मुलांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. बाटलीमध्ये राहिलेले पाणी झाडाला टाकण्याचा निर्धार मुलांनी केला. यावेळी ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ अशी झाडांची-पावसाची गाणी म्हणून मुलांनी उपस्थितांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ने ‘माय सिटी-माय ट्री’ अभियानात दाळमंडई ट्रस्टने दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता. त्यामध्ये तांदळी वडगाव, माळवाडी, देऊळगाव सिद्धी, खडकी, रामकृष्ण इंग्लिश स्कूल आणि छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमातून ९७५ झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण केला.
४नगर तालुक्यातील भातोडी, सांडवा, चिचोंडी पाटील, आठवड, मांडवा आणि निमगाव वाघा येथे एकूण ८०० रोपे देण्यात आली. ही रोपे टप्प्याटप्प्याने लावण्यात येणार आहेत. त्यामुळे दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने दोन हजार झाडांच्या संकल्पापैकी १ हजार ७७५ झाडे लावली आहेत.

Web Title: Nimgaon Beach 'one child-one tree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.