निळवंडेला मधुकर सागर नाव द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:21+5:302021-06-02T04:17:21+5:30
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त निवडक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने त्यांचा धरणस्थळी पिचड यांचा सत्कार करण्यात आला. ...

निळवंडेला मधुकर सागर नाव द्यावे
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त निवडक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने त्यांचा धरणस्थळी पिचड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आभाळे बोलत होते. यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, विठ्ठल आभाळे, प्रमोद आभाळे, दीपक महाराज देशमुख आदी उपस्थित होते.
आभाळे म्हणाले, १९९० मध्ये निळवंडे धरणाच्या पायाभरणीचा, यानंतर ९१ मध्ये घळी भरण्याचा कार्यक्रम हा पिचड यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच झाला. ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा राज्याला दिशादर्शक ठरणारा पॅटर्न निळवंडे निर्मितीवेळी माजी मंत्री पिचड यांनीच घालून दिला. धरणग्रस्थांचे आदर्श पुनर्वसन केले. निळवंडे धरण निर्मितीचे श्रेय आता अनेकजण घेत आहेत; परंतु पिचड यांच्यामुळेच हे धरण झाले. यामुळे लाभ क्षेत्रातील कोरडवाहू जमिनीत पाटाने पाणी पोहचले आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती फुलू लागली आहे. पिचड यांनी धरण निर्मिती आणि पुनर्वसन यासाठी अनेकवेळा संघर्ष केला. त्यामुळे निळवंडे धरणास पिचड साहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. उपस्थितांचे आभार राजेंद्र डावरे यांनी मानले.