नगराध्यक्षांच्या निवडीला पुढील आठवड्याचा मुहूर्त

By Admin | Updated: July 9, 2014 00:05 IST2014-07-08T23:14:53+5:302014-07-09T00:05:00+5:30

अहमदनगर: जिल्ह्यातील रखडलेल्या नगराध्यक्षांच्या निवडी पुढील आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत़ आठ नगराध्यक्षांची मुदत संपुष्टात आल्याने नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे़

The next week's election was chosen by the Chief Election Commissioner | नगराध्यक्षांच्या निवडीला पुढील आठवड्याचा मुहूर्त

नगराध्यक्षांच्या निवडीला पुढील आठवड्याचा मुहूर्त

अहमदनगर: जिल्ह्यातील रखडलेल्या नगराध्यक्षांच्या निवडी पुढील आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत़ आठ नगराध्यक्षांची मुदत संपुष्टात आल्याने नगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे़ नवीन अध्यक्षांच्या निवडीपर्यंत जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर,कोपरगाव, राहुरी, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा आणि शिर्डी नगरपालिकांचा कारभार तहसीलदारांच्या हाती राहणार आहे़
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती़ ही मुदत संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तसे निर्देश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले असून, आता आठ नगरपालिकांचा कारभार तहसीलदारांच्या हाती आला आहे़परिणामी नगराध्यक्षांचे अधिकार संपुष्टात आले असून,नवीन नगराध्यक्षांच्या निवडी होईपर्यंत तहसीलदारांमार्फत नगरपालिकांचा कारभार चालणार असून, नगरपालिकांच्या नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून लवरकच जाहीर केला जाणार आहे़
निवडीचा कार्यक्रम जाहीर करून नगराध्यक्षांच्या निवडी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़
नगराध्यक्षांना शासनाने मुदतवाढ दिली होती़ ही मुदत गत शनिवारी संपुष्टात आली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कवडे यांनी प्रशासकाची नेमणूक केल्याने नगराध्यक्षांना काढता पाय घ्यावा लागला़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकाची नेमणूक झाली आहे़
सत्ताधाऱ्यांना हवी असणारी विकास कामे आता करणे शक्य होणार नसल्याने मतदारांना खूष करणे सत्ताधाऱ्यांना शक्य होणार नाही़
(प्रतिनिधी)
आठ नगरपालिकांत प्रशासक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे़ नगराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात येणार असून, पुढील आठवड्यात ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे़
-चंद्रकांत खोसे, प्रकल्प संचालक, नगरपालिका
उपाध्यक्षांच्या निवडीबाबत संभ्रम
उपाध्यक्षांच्या निवडीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर येत्या २६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे़ त्यामुळे नगराध्यक्षांच्या निवडीसोबतच उपनगराध्यक्षांच्या निवडीचाही कार्यक्रम जाहीर होणार की नाही,याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे़
कोण झाले पायउतार
श्रीरामपूर- जयश्री ससाणे
संगमनेर- दिलीप पुंड
देवळाली प्रवारा- मंदा कदम
कोपरगाव- सुरेखा राक्षे
राहुरी - गयाबाई ठोकळ
राहाता- कैलास सदाफळ
पाथर्डी- अभय आव्हाड
श्रीगोंदा - छायाताई गोरे
शिर्डी - सुमित्रा कोते

Web Title: The next week's election was chosen by the Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.