आजपासून जिल्हा सहकारी बँकेचा पुढचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:07+5:302021-01-08T05:05:07+5:30
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू होत असून, अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार ...

आजपासून जिल्हा सहकारी बँकेचा पुढचा टप्पा
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू होत असून, अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये पहायला मिळणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती; मात्र या टप्प्यावरच निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. बँकेची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्या टप्प्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिला आहे. त्यानुसार सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाकडून बँकेच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतच गुरुवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अंतिम मतदार यादी उपजिल्हा निबंधक कार्यालयास पाठविण्यात येणार असून, तालुकानिहाय मतदारांची यादी तयार केली जाणार आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यावर नाशिक येथील कार्यालयात सुनावणी पूर्ण झाली असून, त्यानुसार काही नावे मतदार यादीत समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
....
साडेतीन हजार मतदार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ३ हजार ५१९ मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात प्रारुप मतदार यादीवर अक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे नवीन नावेही यादीत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
...