दुसऱ्या दिवशीही पोहेगाव बंद
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:32:48+5:302014-06-30T00:35:27+5:30
कोपरगाव : पूर्ववैमनस्य आणि राजकीय द्वेशातून कोपरगाव तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते नितीन औताडे यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ
दुसऱ्या दिवशीही पोहेगाव बंद
कोपरगाव : पूर्ववैमनस्य आणि राजकीय द्वेशातून कोपरगाव तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते नितीन औताडे यांच्यावर शुक्रवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी आणि रविवारी पोहेगावात अघोषित बंद होता़ त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात औताडे यांच्या उजव्या पाण्याच्या मांडीत बंदुकीची गोळी लागली़ डोक्यात तलवारीचा घाव पडल्याने दहा टाके पडले़ नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या औताडे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते़ दरम्यान औताडे यांचे बंधू तुषार औताडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नितीन औताडे व त्यांच्या पत्नी सीमाताई औताडे शुक्रवारी रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते़ तेव्हा सचिन रोहमारे, जयंत रोहमारे, शुभम रोहमारे, अण्णा रोहमारे यांच्यात वाद सुरू होते़ नितीन औताडे वाद मिटविण्यासाठी गेले, असता त्यांच्यावर जयंत रोहमारे, सचिन रोहमारे व शुभम रोहमारे यांनी गोळी झाडून हल्ला केला़ यात ते जखमी झाले़ (प्रतिनिधी)