शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच- पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:07 IST

बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

पारनेर : आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे.  बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी केली.पारनेर-नगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार विजय औटी, जयश्री औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचं नाव घेत नाही. ‘छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतक-यांची वाट लावली. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतक-यांची बँक आहे. आज बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.

दारातल्या चपल्या हीच आपली संपत्ती

सेनापती बापट माझ्या आजोबांना म्हणजे केशवराव ठाकरे यांना भेटायला यायचे. आमच्या दादरच्या घरी बैठका व्हायच्या. घर छोटे होते. घराबाहेर चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा खच आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दाखविला आणि म्हणाले, हे काय आहे? वडील म्हणाले, चपला आहेत. तर आजोबा म्हणाले, ‘नाही. हे आपले वैभव आहे. एव्हढे लोकं आपल्याकडं येतात, तेच आपली संपत्ती आहे.’

स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका

२०५० साली शेतक-यांना दुप्पट भाव देऊ, २०२५ साली सर्वांना मोफत घरे देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे करीत असतानाच लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘अरे टाळ्या काय वाजवता? अशीच स्वप्ने दाखवूनच ते (भाजप) सत्तेत आले. केली का तुमची स्वप्ने पूर्ण? दिले का तुम्हाला अच्छे दिन? म्हणून सांगतो, भानावर या, अशा स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना