वहाडणे यांच्या आरोपांचा घेतला समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:32+5:302021-03-04T04:37:32+5:30

रितसर जागा खरेदी केली सेनेचे नगरसेवक जाधव म्हणाले, मी कोठेही अतिक्रमण केलेलं नाही. ती जागा रितसर बँकेचा चेक देऊन ...

News of Vahadane's allegations | वहाडणे यांच्या आरोपांचा घेतला समाचार

वहाडणे यांच्या आरोपांचा घेतला समाचार

रितसर जागा खरेदी केली

सेनेचे नगरसेवक जाधव म्हणाले, मी कोठेही अतिक्रमण केलेलं नाही. ती जागा रितसर बँकेचा चेक देऊन खरेदी केली आहे. मात्र, त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली त्यावेळी पावत्या फाडून जमा केलेल्या पैशांचे नेमके काय केले, याचा हिशोब दिला तर बरे होईल. तर नगरसेवक शिवाजी खांडेकर म्हणाले, नगराध्यक्षांनी आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचे काम करू नये.

....

तुमचे एखादे तरी काम सांगा?

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, आम्ही गेल्या ५५ वर्षांपासून नगर परिषदेत सत्तेवर आहोत. त्यामुळे सर्वाधिक कामे ही सातभाई कुटुंबाने केली आहे. मात्र, नगराध्यक्षांनी केलेले एखादे काम सांगावे.

....

सह्यांचे अधिकार कोणाला आहेत?

नगरसेवक विजय वाजे म्हणाले, मी मलिदा खाल्ला असे नगराध्यक्ष म्हणाले; परंतु ज्यांना सह्यांचा अधिकार आहे, त्यांना मलिदा मिळेल की सह्यांचा अधिकार नसणाऱ्यांना? तुम्हीच सांगा. तर माजी नगरसेवक बबलू वाणी म्हणाले, नगराध्यक्ष जाणूनबुजून माझी व आमचे नेते कोल्हे कुटुंबीयांची बदनामी करीत आहेत.

Web Title: News of Vahadane's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.