रंजनकुमार शर्मा नगरचे नवे पोलीस अधीक्षक

By Admin | Updated: April 28, 2017 14:12 IST2017-04-28T14:12:34+5:302017-04-28T14:12:34+5:30

नागपूर शहर उपायुक्तपदी कार्यरत असलेले रंजनकुमार शर्मा यांची नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षपदी नियुक्ती झाली झाली आहे़

New Superintendent of Police of Ransom Sharma Sharma Nagar | रंजनकुमार शर्मा नगरचे नवे पोलीस अधीक्षक

रंजनकुमार शर्मा नगरचे नवे पोलीस अधीक्षक

आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ २८ - नागपूर शहर उपायुक्तपदी कार्यरत असलेले रंजनकुमार शर्मा यांची नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षपदी नियुक्ती झाली झाली आहे़ नगरचे पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी यांना मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी बढती मिळाली आहे़
नूतन अधीक्षक शर्मा हे १ मे रोजी पदभार घेणार असल्याचे समजते़ त्रिपाठी यांची मे २०१५ मुंबई येथून नगरला अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती़ त्रिपाठींच्या कार्याकाळात नगर जिल्ह्यात सोनई तिहेरी हत्याकाड, जवखेडेखालसा हत्याकांड, कोपर्डी अत्याचार आणि पांगरमल दारूकांड अशा घटना घडल्या़ त्यामुळे त्याचा कार्यकाळ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता़ शर्मा यांच्यासमोर आता जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करणे हे पहिले आवाहन राहणार आहे़

 

Web Title: New Superintendent of Police of Ransom Sharma Sharma Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.