शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नव्या रंगात नव्या ढंगात, 'काळू-बाळू'चा तमाशा आता डिजीटल युगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:48 IST

सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे.

बाळासाहेब काकडे

श्रीगोंदा : छत्रपती शाहू महाराजांची पाठीवर थाप पडलेल्या काळू-बाळू तमाशाची लोकप्रियता आजही जुन्या रसिक पिढीच्या मनात रूंजी घालत आहे. तमाशा म्हटले ‘काळू-बाळू’ अन् ‘काळू-बाळू’ म्हटले की तमाशा असा कला क्षेत्रात आजच्या भाषेत एक ब्रँडच तयार झाला होता. पण आज दररोज मिळणारे उत्पन्न व होणाऱ्या खर्चाचा मेळ बसत नाही. त्यामुळे तरूण तमाशा शौकिनांच्या भावना विचारात घेऊन पुढील वर्षापासून ‘काळू-बाळू जल्लोश महाराष्ट्राचा’ नावाने लोकनाट्य क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून नवी वाट चोखाळणार आहे.या तमाशा मंडळाचे मालक विजय खाडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोककलेला नवी झळाळी देणारा काळू-बाळू हा राज्यातील पहिला तमाशा ठरणार आहे.

सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सातुजी खाडे यांनी सन १९०२ मध्ये तमाशा फडाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे चिरंजीव शिवा व संभा हे दिवसा कुस्त्यांच्या फडात कुस्त्या करायचे आणि रात्री तमाशात काम करायचे. त्यांची मुले लहू संभाजी खाडे (काळू) व अंकुश संभाजी खाडे (बाळू) यांनी बैलगाडीतील तमाशा ट्रक गाडीत आणला. लहू-अंकुश हे दोघेही दिसण्यास सारखे असल्याने त्यांचे नाव काळू-बाळू ठेवले. ही विनोदी जोडी तमाशा क्षेत्रात सुपरस्टार झाली. काळू बाळू तमाशा म्हटले की लोककलेचा आविष्कार होता. ‘जहरी पेला’ या वगाचे प्रयोग अनेक गावांमध्ये वन्समोअर झाले. आज त्यांच्या नव्या पिढीने काही बदल करून तमाशा क्षेत्रात काळू बाळूचा ब्रँड कायम ठेवला आहे. पण, इलेक्ट्रॉनिक माध्यमे गतिमान झाल्याने ग्रामीण भागातील लोककलेला त्याचा अधिक फटका बसला. अशा परिस्थितीत तमाशा फडाचे भवितव्य अंधारमय होऊन त्यांच्यासमोर धोक्याचा भोंगा वाजत आहे. काळू बाळू यांच्या परिवाराने तमाशा अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शिकलेले १५ तरूण स्त्री-पुरूष कलाकार लावणी, हिंदी-मराठी गाणी, जनजागृतीपर फार्स व वगनाट्ये सादर करणार आहेत. आमचे आजोबा शिवा व संभा खाडे कोल्हापूर जिल्ह्यात तमाशा करीत असताना त्यांनी शाहू महाराजांची भूमिका हुबेहुब केल्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन महाराजांनी बिदागी व कपडे दिले होते. त्यांची जाणीव ठेऊन आमचे काम सुरू असल्याचे विजय खाडे म्हणाले.

असे असतील बदलमनोरंजन वाहिन्यांच्या धर्तीवर वगनाट्य, गीते बसविणार असून, त्यामध्ये अधिकाधिक शिक्षित तरुण स्त्री, पुरुष कलाकार असणार आहेत. वाद्यांसोबतच इतरही साधने अत्याधुनिक असणार आहेत.

हलगीवर थाप अन् बाळूवर अंत्यसंस्कारविनोद सम्राट बाळूचे (अंकुश खाडे) यांचे मिरजमध्ये निधन झाले. त्यावेळी लोणावळ्यात काळू बाळू लोकनाट्याचा प्रयोग होता. आम्ही गावकऱ्यांना विनंती केली या तमाशाचे मालक बाळू गेले, त्यामुळे आजचा खेळ रद्द करा, पण त्यांनी ऐकले नाही. यात्रेला आम्ही पाहुण्यांना काय दाखविणार? रात्री दहा वाजता आम्ही हालगीवर थाप टाकली अन् त्याचवेळी कवलापूर येथे बाळूच्या चितेला अग्निडाग देण्यात आला. त्या रात्री आम्ही मंचामागे गेलो की रडायचो अन् मंचावर आलो की हसायचो. प्रयोग संपल्यानंतर आम्ही कलावंत एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडलो. दुसऱ्या दिवशी आम्ही बाळूला सावडण्यासाठी कवलापूरला गेलो. हा प्रसंग सांगताना विजय खाडे यांना रडूच कोसळले.

 

टॅग्स :artकलाdigitalडिजिटलAhmednagarअहमदनगरMumbaiमुंबईSangliसांगली