नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:45+5:302021-07-20T04:16:45+5:30
नेवासा फाटा : नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समितीच्या अध्यक्षपदी सोनई येथील शनैश्वर उच्च माध्यमिकचे प्रा. गोवर्धन रोडे ...

नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समिती
नेवासा फाटा : नेवासा तालुका जुनी पेन्शन कृती समितीच्या अध्यक्षपदी सोनई येथील शनैश्वर उच्च माध्यमिकचे प्रा. गोवर्धन रोडे यांची तर सचिवपदी तुकाराम फटांगरे यांची निवड करण्यात आली.
नेवासे फाटा येथील श्री दादासाहेब घाडगे विद्यालयात नुकतीच नेवासे तालुका तालुका जुनी पेन्शन कृती समिती सदस्यांची बैठकी पार पडली. त्यात या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी प्राचार्य सोपान काळे, जिल्हा जुनी पेन्शन समितीचे संजय भुसारी, नितीन मुंगसे, शरद कराड, आबासाहेब घाडगे, महेश देशमुख उपस्थिती होते. यावेळी उपस्थितांनी जुनी पेन्शन कृती समितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी लढा उभारण्याचा निर्धार केला. राज्यातील शिक्षक आमदारांच्या माध्यमातून याप्रश्नी पाठपुरावा करणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे. यावेळी जयंत पाटील, सुनील इंगळे, रावसाहेब कर्जुले, संजय चव्हाण, पांडुरंग उगले, गणेश आरगडे, बापू सरोदे, प्रा. हरिश्चंद्र माने, प्रा. कंकर वडागळे आदी विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
190721\img-20210718-wa0019.jpg
प्रा. गोवर्धन रोडे