नेवासा : राहुरी येथील महाराष्ट्र दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी केली.
निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी व नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे, अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, नानासाहेब पवार, शाम मापारी, सुहास पठाडे, शंकर नाबदे, मकरंद देशपांडे, पवन गरुड, मोहन गायकवाड, अभिषेक गाडेकर, आदी उपस्थित होते.
--
०८ नेवासा निवेदन
राहुरीतील पत्रकाराच्या हत्येचा निषेध नोंदविणारे निवेदन नेवासा येथील पत्रकारांच्या वतीने नायब तहसीलदारांना देण्यात आले आहे.