नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:19+5:302021-09-02T04:46:19+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे संपूर्ण तुटून पडली व डोक्याला गंभीर ...

नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे संपूर्ण तुटून पडली व डोक्याला गंभीर मार लागला आहे, तसेच त्यांचे अंगरक्षक पालवे यांच्या हाताचे बोट तुटून पडले. एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे ही चिंताजनक बाब असून, नेवासा नगरपंचायतीच्या वतीने जाहीर निषेध करत कामकाज बंद करण्यात आले आहे व हा हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी तहसीलदार रूपेश सुराणा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी नेवासा नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र गुप्ता, कर निरीक्षक रामदास म्हस्के, सुशील चक्रनारायण, ताराचंद चव्हाण, प्रताप कडपे, परशुराम डौले, योगेश गवळी, राहुल आढाव, इसाक इनामदार, अनिता सोनवणे, इंदूबाई चव्हाण आदींची उपस्थिती होती.
310821\20210831_152430.jpg
नेवासा : ठाणे महानगरपालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले