जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके

By Admin | Updated: July 25, 2016 00:07 IST2016-07-24T23:47:59+5:302016-07-25T00:07:11+5:30

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली़ कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचाऱ्यांनी आपला विभाग नीटनेटका केला़

Neutralize the Collector Office | जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके

जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली़ कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचाऱ्यांनी आपला विभाग नीटनेटका केला़ दरम्यान प्रांगणातील गौण खनिजची पकडलेली वाहनेही सायंकाळी बाहेर काढण्यात आली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग काहीसे नीटनेटके पाहायला मिळाले़ पण, हा नेटकेपणा किती दिवस टिकेल, हा खरा प्रश्न आहे़
जिल्हाधिकारी कार्यालयात १ आॅगस्ट रोजी महसूलदिन साजरा केला जातो़ यंदा प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, यावर स्पर्धा घेण्यात येणार आहे़ ही स्पर्धा घेण्यामागे कार्यालयाबरोबर कर्मचाऱ्यांच्या कामात नीटनेटकेपणा यावा, हा उद्देश आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई , रोहयो, नगरपालिका, गृह, महसूल, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा स्वागत कक्ष, ग्रामपंचायत, जिल्हा पुरवठा, सामान्य प्रशासन, दुय्यम निबंधक, रेकॉर्ड शाखा, प्रांत अधिकारी कार्यालये आहेत़ याशिवाय प्रमुख अधिकाऱ्यांची दालनेही आहेत़ यापैकी जो विभाग स्वच्छ असेल ,त्या विभागाचे कर्मचारी आणि त्यांचे प्रमुख, यांचा महसूलदिनी पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार आहे़ महसूल दिनाच्याआधी एक दिवस पुढील आठवड्यात समितीमार्फत अचानक पाहणी केली जाणार आहे़ पाहणीत पितळ उघडे पडायला नको, म्हणून कर्मचारी कामाला लागले आहेत़ गौण खणिज, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत शाखेतील कर्मचाऱ्यांनी अस्ताव्यस्त पडलेल्या फायली काढून त्या व्यवस्थित ठेवल्या आहेत़ स्वच्छतेत महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठा होता़ कार्यालयातील कपाट स्वच्छ करून कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यात आले़ काही विभागांनी मात्र यात रस दाखविला नाही़ पारितोषिक नको, असे म्हणून स्वच्छता करण्यास टाळाटाळ केली़
कार्यालयांच्या दरवाजांवर लटकवलेले फलक जुनाट झाले होते़ ते ही बदलण्यात आले आहेत़ प्रमुख अधिकाऱ्यांची समितीकडून विभागाची पाहणी होणार आहे़ पाहणीच्यावेळी कार्यालय नीटनेटके दिसले पाहिजे़ कामाला लागा, साफसफाई करा, असे फर्मानच काही विभाग प्रमुखांनी काढल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़ कार्यालयातील कुठल्या कर्मचाऱ्यांकडे कोणते काम आहे, याची एक यादीच दर्शनी भागात लावण्याच्या सूचना आहेत़ या सूचनेचे केवळ सामान्य प्रशासन विभागानेच पालन केले, इतरांनी मात्र तसे न करता कर्मचारी आणि त्यांच्या पदाचे बोर्ड भिंतीवर ठोकले आहेत़ तर काही ते टेबलावर ठेवले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Neutralize the Collector Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.