राष्ट्रवादीतील गटबाजीकडे सेना, काँॅग्रेसची नजर!

By Admin | Updated: June 11, 2014 00:18 IST2014-06-10T23:43:02+5:302014-06-11T00:18:26+5:30

विनोद गोळे, पारनेर पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवरच शिवसेना व काँॅग्रेस लक्ष ठेवून आहे.

NCP's clash with army, Cong | राष्ट्रवादीतील गटबाजीकडे सेना, काँॅग्रेसची नजर!

राष्ट्रवादीतील गटबाजीकडे सेना, काँॅग्रेसची नजर!

विनोद गोळे, पारनेर
पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने गटबाजी उफाळून आली आहे. या गटबाजीवरच शिवसेना व काँॅग्रेस लक्ष ठेवून आहे. राष्ट्रवादीतील या सुंदोपसुंदीचा फायदा घेत मतदारसंघ वाटणीत पदरात पाडून घेण्यासाठी काँॅग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार विजय औटी यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तरीही बाबासाहेब तांबे, रामदास भोसले हे इच्छुक आहेत. सध्या शांत बसून पुढील समीकरणे पक्की करण्याची भोसले यांची खेळी असल्याने ते आमदारांबरोबरच राहतील. परंतु तांबे यांचा मार्ग अजूनही ‘एकला चलो रे’ चा आहे. शिवाय सेनेचे शशिकांत गाडे नगर शहरातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने आ. औटी व त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये पश्चिम महाराष्ट विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुजीत झावरे, बाजार समिती सभापती काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, निंबळकचे (नगर) उद्योजक माधव लामखडे, म्हस्केवाडीचे उद्योजक राजेंद्र शिंदे, बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड अशी इच्छुकांची वाढतच जाते. यातच गटबाजी वाढीस लागली आहे. काशिनाथ दाते व सुजीत झावरे या दोघांचा परस्पर विरोध आहे. हे दोघे प्रमुख दावेदार आहेत. तर दोघांमध्ये तिसरे असलेले उदय शेळकेही आपली पाटी भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्वांच्या गटबाजीवर सेना व काँग्रेस लक्ष ठेवून आहे. नगरमधील माधव लामखडे या मतदारसंघात उमेदवारीस इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीतील गटबाजीचा लाभ यापूर्वी सेनेने घेतल्यानेच विजय औटी आमदार झाले. आता पुन्हा राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आल्याने काँग्रेसने पारनेर मतदारसंघ आपल्याकडे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नंदकुमार झावरे व त्यांचे पुत्र जिल्हा काँॅगे्रस उपाध्यक्ष राहुल झावरे हे दोघेही विधानसभेसाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांना मतदारसंघ मिळावा यासाठी बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विधे हे पिता-पुत्र प्रयत्नशील आहेत.
मोदी लाटेचा विधानसभेला धोका होऊ नये म्हणून दोन्ही काँग्रेसने ताकदीने लढायचे ठरविले तर ज्येष्ठ नेते, माजी आमदार नंदकुमार झावरे यांना आघाडीचा उमेदवार म्हणून समोर करण्याचा पर्यायही हाताळला जावू शकतो. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मतद घेतली जाण्याची शक्यता आहे. पवार व नंदकुमार
झावरे यांची राजकीय मित्रता या जुळवणीला कारणीभूत ठरणार, अशी चर्चा आहे.
बोटावर मोजण्याइतके कार्यकर्तेे तालुक्यात असताना भाजपाने पारनेर मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे पारनेरचे राजकारण राष्ट्रवादीतील घडामोडींकडे लक्ष ठेवून असले तरी सामना रंगतदार होईल, असे म्हटले जाते.

Web Title: NCP's clash with army, Cong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.