कर्जतला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST2021-06-11T04:15:10+5:302021-06-11T04:15:10+5:30

कर्जत : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बावीसवा वर्धापन दिन कर्जत येथे उत्साहात साजरा करण्यात आला. येथील डायनॅमिक इंग्लिश ...

NCP's anniversary in Karjat in excitement | कर्जतला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात

कर्जतला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उत्साहात

कर्जत : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बावीसवा वर्धापन दिन कर्जत येथे उत्साहात साजरा करण्यात आला. येथील डायनॅमिक इंग्लिश स्कूल येथे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकाविण्यात आला.

यावेळी कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, दिलीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, नगरसेवक बापूसाहेब नेटके, दूरगावचे सरपंच अशोक जायभाय, प्रसिद्धीप्रमुख दीपक यादव, माजी सभापती नाना निकत, रज्‍जाक झारेकरी, सचिन कुलथे, सचिन मांडगे, भास्कर भैलुमे, सुधीर जगताप, ऋषिकेश धांडे, मनोज गायकवाड, नितीन तोरडमल, सचिन धांडे, बिभीषण खोसे, नितीन तोरडमल, सचिन लाळगे, दादासाहेब चव्हाण, डॉ. संतोष भंडारी, डॉ. शबनम इनामदार आदी उपस्थित होते. मिरजगाव, राशीन येथेही वधार्पन साजरा झाला.

---

१० कर्जत एनसीपी

कर्जत येथील डायनॅमिक इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रवादीचा वर्धापन साजरा करण्यात आला.

Web Title: NCP's anniversary in Karjat in excitement