शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुहेरी हत्याकांड, मुख्य सूत्रधार उल्हास माने गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 12:17 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार उल्हास मानेला अटक करण्यात आले आहे.

अहमदनगर -  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार उल्हास मानेला अटक करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद उर्फ स्वामी गायकवाडला (वय 20 वर्ष) अटक करण्यात आली होती. जामखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. मुजावर यांनी त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गायकवाडला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवार 3 मे रोजी मांडवगण फराटा (पुणे) येथून अटक केले होते. जामखेडमध्ये २८ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.  

बाचाबाची ते हत्याकांडगोविंद गायकवाड व राळेभात बंधू यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून वितुष्ट होते. डिसेंबर २०१६मध्ये राळेभात कुटुंबीयांच्या परिचयातील एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना गोविंद गायकवाडकडून त्या वृद्धाच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. त्यामुळे वृद्धाने याचा जाब गोविंदला विचारला. त्याचा राग आल्याने गोविंदने त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. याबाबत संबंधित वृद्धाने योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना माहिती दिली. त्यानंतर राळेभात बंधूंनी गोविंदला गाठून मारहाण केली. तेथूनच या वादाला सुरूवात झाली. पुढे हा वाद विकोपाला गेला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते भांडण मिटले. त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद आलीच नाही. त्यानंतर या दोन गटांत कायमच खुन्नस राहिली. रस्त्याने येता-जाता रागाने पाहणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरूच होते. राळेभात गटाचे हे वर्चस्व सहन न झाल्याने गोविंद गायकवाडने राळेभात बंधूंचा काटा काढण्याचा निश्चय केला. योगेश व राकेश एकाच वेळी एकांतात कुठे भेटतील, अशा संधीच्या शोधात तो गेल्या अडीच महिन्यांपासून होता. हत्येच्या घटनेपूर्वीही त्याने एक-दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी ठरला नाही. अखेर गोविंदने दि. २८ रोजी सायंकाळी योगेश व राकेश यांना एकांतात गाठलेच. गोविंदने योगेशवर, तर दुसऱ्या अल्पवयीन साथीदाराने राकेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात तिसरा आरोपी विजय सावंत याचाही सहभाग होता. परंतु तो अद्याप फरार आहे, अशी कबुली खुद्द गोविंद व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेशातून आणले पिस्तूलराळेभात गटासोबत रोजच होणा-या कटकटीला गोविंद वैतागला होता. एक काय तो निकाल लावण्याचा चंग त्याने बांधला. त्यातूनच हत्येचा प्लॅन पुढे आला. योगेश व राकेश यांना मारण्यासाठी गोविंदने दोन पिस्तुल व काही काडतुसे मध्य प्रदेशला जाऊन आणली. पोलिसांनी आता ती जप्त केल्याचे समजते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस