शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखविले जातेय; शिर्डी शिबिरात अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 08:04 IST

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे मंथन शिबिर शुक्रवारी सुरू झाले. त्यात अजित पवार बोलत होते

शिर्डी (जि. अहमदनगर) : राजकारणात राक्षसी महत्त्वाकांक्षा बळावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आमिष दाखविले जात आहे. मात्र, कोणीही खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

शिर्डी येथे राष्ट्रवादीचे मंथन शिबिर शुक्रवारी सुरू झाले. त्यात अजित पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

पक्षप्रमुख शरद पवार यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतला. अजित पवार म्हणाले, की शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठविण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. पक्षातून वेगळे होणे एकवेळ समजू शकतो. मात्र, घरच उद्ध्वस्त करण्याची बेईमानी जनतेला पटलेली नाही.

‘शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ’ 

सरकारमधील व विशेषत: शिंदे गटातील अनेक आमदार आपल्यातील खदखद बोलून दाखवत आहेत. अनेकजण अस्वस्थ आहेत. या सरकारवर टांगती तलवार आहे. त्यांचे सर्व निर्णय रद्द होण्याची भीती आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस