राष्ट्रवादी देणार अकरा हजार युवकांना मोफत लायसन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:31+5:302021-07-21T04:15:31+5:30
कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोफत दुचाकी व चारचाकी परवाना ...

राष्ट्रवादी देणार अकरा हजार युवकांना मोफत लायसन्स
कर्जत : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोफत दुचाकी व चारचाकी परवाना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.
अनेक शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या लायसन्ससाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, टू व्हीलर व फोर व्हीलर लायसन्स नोंदणीसाठी १७ ते २१ जुलै अशी पाच दिवसांची मुदत दिली आहे. हे शिबिर तालुक्यातील १८ गावांत घेण्यात आले. कर्जत येथील शिबिराप्रसंगी नितीन धांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, कार्याध्यक्षा डॉ. शबनम इनामदार, सचिन कुलथे, सचिन धांडे, भास्कर भैलुमे, अभय बोरा, प्रसिद्धीप्रमुख दीपक यादव, पृथ्वीराज चव्हाण, राहुल नवले, राहुल खराडे, सचिन सोनमाळी आदी उपस्थित होते.
..............
दहा हजार जणांची नाेंदणी
कर्जत शहरासह भांबोरा, बारडगाव सुद्रीक, निमगाव गांगर्डा, कोरेगाव, राशीन, कुळधरण, मिरजगाव, चापडगाव आदी भागातील प्रमुख गावांत हे नोंदणी शिबिर घेण्यात आले आहे. शिबिरात १० हजार ७१० लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
...............
२० कर्जत राष्ट्रवादी
कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात अर्ज भरून घेताना नितीन धांडे, विशाल म्हेत्रे आदी.