शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविणार - किरण काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:58 IST

मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत.

अहमदनगर : मागील तीस वर्षांपासून शहर विकासापासून वंचित आहे. काही संधीसाधू नेते राजकीय भांडवल करीत स्वत:ची राजकीय पोळी भाजत आहेत.यामुळे नगरची राज्यभर बदनामी झाली असून याबद्दल सामान्य नगरकरांच्या मनात तीव्र संताप आहे. या नेत्यांना आता जनता वैतागली असून नगरकरांना अपेक्षित असणारा सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.शहराच्या विकासासाठी आणि नगरकरांच्या मानगुटीवर बसलेल्या तथाकथित नेत्यांच्या तावडीतून शहराची कायमची सुटका करण्यासाठी नगरकरांचे ऐतिहासिक जनआंदोलन उभारून निर्णायक लढाई लढणार असल्याचे आणि त्यासाठी काहीही झाले तरी माघार घेणार नसल्याचे यावेळी काळे यांनी स्पष्ट केले.काळे म्हणाले, शहराच्या सर्वच नेत्यांनी कायम सेटलमेंटच राजकारण केले. महानगरपालिका वाटून घेत खाल्ली. एमआयडीसी विकसित होऊ दिली नाही. उद्योजकांच शोषण केले. शहरातील नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून कामगार युनियनच्या माध्यमातून कामगार आणि उद्योजक यांना वेठीस धरले. यामुळे नवीन उद्योग तर आले नाहीच पण आहेत ते अनेक बंद पाडले गेले. त्यामुळे एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी शहरातील युवकांना संघटीत करून जनआंदोलन उभे करणार असल्याचे, काळे यांनी यावेळी सांगितले.भाजपला शहरात मिळालेले विक्रमी मताधिक्य आत्मपरीक्षण करायला लावणारेशहरात पक्षाचे दोन आमदार आहेत. तरी होम ग्राउंडवर आमच्या उमेदवाराची झालेली सुमारे ५४,००० मतांची पीछेहाट ही धोक्याची घंटा आहे. मी सन २०१० पासून राष्ट्रवादी युवक संघटनेत काम करीत आहे. खा.सुप्रिया सुळे यांच्या मुळेच मला युवक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली. विकासात्मक दूरदृष्टी असणा-या स्वच्छ प्रतिमेच्या सक्षम उच्चशिक्षित युवा नेतृत्वाची आज नगर शहराला गरज आहे. मी व्यवस्थापन शाखेचा पदवीधर असून सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मला कोणतीही वलयांकित राजकीय पार्श्वभूमी नाही.मी लवकरच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, प्रभारी आ.दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे आदींच्या भेटी घेवून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगताप