शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या आमदाराची शिपायास मारहाण, गाडी हळू चालवा म्हणाल्याचा आला राग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 10:16 IST

राजूर ( जि. अहमदनगर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला केली आहे. या प्रकरणी लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर ( जि. अहमदनगर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभा सदस्य आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपणाला मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला केली आहे. या प्रकरणी लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुरुवारी( दि. १७ सप्टेंबर) तक्रारदार हा खडकी बुद्रुक दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावात दत्त मंदिराजवळ पायी जात होते. यावेळी मागून आमदार डॉ . किरण लहामटे यांची गाडी आली आणि जोरात येऊन कट मारून गेली. त्यावेळी आम्हाला वाटले पर्यटक आहेत,  म्हणून गाडी हळू चालवा असे ओरडून सांगितले.  त्या गोष्टीचा राग येऊन आमदार लहामटे यांनी गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरले व म्हणाले,  मला ओळखले का ? असे म्हणून त्यांनी मारहाण करून मला शिवीगाळ केली व गाडीत बसून निघून गेले. यावेळी त्याच्यासोबत मनोहर सखाराम भांगरे होते. राजूर पोलिसांनी रखमा बांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार डॉ लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा ( रजि . क्रमांक १२८३/२० भादंवि ५०४. ५०६ ) दाखल केला आहे. 

----

 

 

गुरुवारी दुपारी लव्हाळीला चाललो होतो.  खडकीत ही व्यक्ती माझ्या वाहनाला आडवी आली.  ती व्यक्ती दारू पिलेली होती. आडवे येऊनही त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. मी वाहनातून उतरून त्याच्यावर रागावलो आता तरी सुधार अशी खडक समज देत मी निघून गेलो. मात्र एका दारू पिणाऱ्याची बाजू घेऊन कोणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे आहे.

 

डॉ. किरण लहामटे, आमदार

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर