शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

महापौरपदासाठी भाजप-राष्ट्रवादीची आघाडी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 10:37 IST

महापौरपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रिशंकू परिस्थिती होती.

अहमदनगर : महापौरपदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत त्रिशंकू परिस्थिती होती. शुक्रवारी निवडीच्या वेळी सभागृहात राष्टÑवादी व भाजप कुणाला पाठिंबा देणार? यावरच सर्व गणिते अवलंबून आहेत. या दोन्ही पक्षांचे अंतर्गत साटेलोटे असून ते एकमेकाला पूरक भूमिका घेतील अशी चर्चा आहे. काँग्रेसच्या सुजय विखे यांनी कुणालाच साथ न करण्याची भूमिका घेतली आहे.महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपली. सेनेकडून बाळासाहेब बोराटे, भाजपकडून बाबासाहेब वाकळे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना-भाजप यांची युती शुक्रवारी सायंकाळपर्यंत साकारलेली नव्हती. कोणत्याही परिस्थितीत भाजपची मदत घ्यायची नाही, असा मातोश्रीचा आदेश आहे, असे सेनेचे स्थानिक नेते खासगीत सांगत आहेत. भाजपनेही सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती. राष्टÑवादीनेही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.सध्या शिवसेना २४, भाजप १४, राष्टÑवादी १८, काँग्रेस ५, बसपा ४, समाजवादी पक्ष १ व अपक्ष २ असे बलाबल आहे. एका अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १९ वर जाते.बसपाच्या तीन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १७ वर पोहोचते. ६८ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३५ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा आकडा अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने गाठलेला नाही. शिवसेनेला भाजपने पाठिंबा न दिल्यास ते चोवीसच्या पुढे सरकू शकत नाही. हीच अवस्था भाजपची आहे. सर्व अपक्ष व समाजवादी पक्ष त्यांच्यासोबत गेल्यानंतरही ते वीसच्या पुढे जाऊ शकत नाही. राष्टÑवादीने समाजवादी पक्ष, काँग्रेस, सर्व अपक्ष व बसपा यांचा पाठिंबा घेतल्यास ते ३० जागांवर जातात.मात्र, काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने राष्टÑवादी अडचणीत आहे. राष्टÑवादी, काँग्रेस व छोट्या पक्षांना एकत्र घेऊन महापौर पदाचे गणित जुळवू शकते. मात्र,राष्ट्रवादीची तशी इच्छाशक्ती दिसत नाही.सर्व पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेऊन निवडणूक लढल्यास सेनेचे पारडे जड होऊ शकते. मात्र, भाजप-राष्टÑवादी एकमेकाला मदत करण्यासाठी आपला उमेदवार मागे घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.भाजप-राष्ट्रवादी फिक्सिंग ?केडगाव प्रकरणी आमदार संग्राम जगताप व आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सरकारचा दबाव असल्याने राष्ट्रवादी  काँग्रेस महापौर पदाच्या निवडीत भाजपला मदत करण्याची भूमिका घेईल, अशी चर्चा आहे. भाजपचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा चर्चेला आला आहे. मात्र, याप्रकरणात आमदार जगताप व राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मौन धारण केले आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत साटेलोटे असल्याचे बोलले जाते. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारांमुळे राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक स्वत:हून भाजपसोबत जाण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे.भाजप-राष्ट्रवादी यांचा ‘व्हीप’ नाहीनगरसेवकांनी पक्षीय भूमिका डावलून इतर पक्षांना मदत करु नये यासाठी नगरसेवकांना ‘व्हिप’ बजावला जातो. असा व्हिप केवळ सेनेने बजावला आहे. राष्ट्रवादी व भाजप यांनी आपल्या नगरसेवकांना काहीही व्हिप बजावलेला नाही. नगरसेवकांना सोयीस्कर भूमिका घेता यावी यासाठीच व्हिप काढला नसल्याची चर्चा आहे.ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर गणितेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला पाठिंबा देण्याचे धोरण घेतल्यास शिवसेनेचा महापौर होईल. यात उद्धव ठाकरे यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. भाजपचा पाठिंबा घेण्यास ठाकरे तयार आहेत का? हाही मुद्दा आहे.महापौरपदाचे उमेदवारबाबासाहेब वाकळे (भाजप)संपत बारस्कर (राष्ट्रवादी)बाळासाहेब बोराटे (शिवसेना)उपमहापौरपदाचे उमेदवारमालन ढोणे (भाजप)रुपाली वारे (काँग्रेस)गणेश कवडे (शिवसेना)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक