शेवगावात राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढत : नगराध्यक्ष पदासाठी मोहिते-तिजोरेंचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:24 IST2018-07-27T18:24:45+5:302018-07-27T18:24:53+5:30
शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष विजयमाला तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

शेवगावात राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढत : नगराध्यक्ष पदासाठी मोहिते-तिजोरेंचे अर्ज
शेवगाव : शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष विजयमाला तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले. बुधवार १ आॅगस्टला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.
दोन्ही उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रम बांदल तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत तिजोरे व मोहिते यांनी अर्ज दाखल केले. तिजोरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून मावळत्या नगराध्यक्षा विद्या लांडे, तर अनुमोदक म्हणून मावळत्या उपनगराध्यक्ष यमुनाबाई ढोरकुले यांच्या सह्या आहेत. मोहिते यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाजपच्या गटनेत्या सविता दहिवाळकर, तर अनुमोदक म्हणून शारदा काथवटे यांच्या सह्या आहेत.
या निवडणुकीनिमित्त शेवगावातील राजकारण चांगलेच ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नगरपालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा कायम रहावा, यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने तर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकण्यासाठी आमदार राजळे समर्थकांनी आपआपल्या राजकीय हालचाली गतीमान केल्या आहेत. पडद्याआडून डाव प्रतिडाव आखण्यास सुरूवात झाली आहे. एकमेकाच्या गोटातील नगरसेवकांना गळाला लावण्याचे डावपेच सुरू असून त्यास यश येणार काय? सताधारी राष्ट्रवादीच्या गोटात मध्यंतरी नगराध्यक्षावरील अविश्वास नाट्यातून उद्भवलेली नाराजी दूर करण्यास पक्षश्रेष्ठींना यश येऊन सध्याची बारा नगरसेवकांचीआघाडी एकसंघ राहणार की, सत्ताधाºयांमधील मतभेदांचा फायदा उठविण्यात भाजपला यश येणार का? याकडे राजकारण्यांबरोबरच शेवगावकरांचेही लक्ष लागले आहे.