भाजपाविरुध्द राष्ट्रवादीत लढत
By Admin | Updated: July 30, 2016 00:31 IST2016-07-30T00:20:43+5:302016-07-30T00:31:17+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलै रोजी निवडणूक होत आहे. निवडणूकरिंगणातून मीना शेंडगे यांनी माघार घेतली आहे.

भाजपाविरुध्द राष्ट्रवादीत लढत
श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलै रोजी निवडणूक होत आहे. निवडणूकरिंगणातून मीना शेंडगे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपाचे मनोहर पोटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्कड मोटे यांच्यात सरळ सामना होत आहे. दोन्ही गटांनी मिळून वीस नगरसेवकांना व्हीप बजावला आहे.
पालिकेत सत्ताधारी व विरोधी गटाचे प्रत्येकी नऊ नगरसेवक आहेत. दोन्ही गटांमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. भाजपाचे मनोहर पोटे यांनी तेरा तर काँग्रेसचे भरत नाहाटा यांनी सात नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. गयाबाई सुपेकर, संगीता खेतमाळीस, वैशाली आळेकर, कुसुम दांडेकर या चार नगरसेविकांनाही दोन्ही गटांनी व्हीप बजावला आहे.
आमच्या चार नगरसेविकांना भाजपाने बोगस व्हीप बजावला आहे. या व्हीपला कायदेशीर आधार नाही, असा दावा गटनेते भरत नाहाटा यांनी केला तर भाजपाचे मनोहर पोटे यांनी आमचा चौदा नगरसेवकांचा गट असल्याचा दावा केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)