एनसीसी छात्रसैनिकांनी केले २१ हजार बियांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:54+5:302021-06-09T04:25:54+5:30

लाॅकडाऊन असल्याने छात्रांनी आपापल्या भागात या बियांचे रोपण केले. या उपक्रमामध्ये १०० छात्र सैनिकांनी सहभाग नोंदविला. कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या ...

NCC students planted 21,000 seeds | एनसीसी छात्रसैनिकांनी केले २१ हजार बियांचे रोपण

एनसीसी छात्रसैनिकांनी केले २१ हजार बियांचे रोपण

लाॅकडाऊन असल्याने छात्रांनी आपापल्या भागात या बियांचे रोपण केले. या उपक्रमामध्ये १०० छात्र सैनिकांनी सहभाग नोंदविला. कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या वाड्या-वस्त्यांवर एकूण ६० ठिकाणी हा उपक्रम छात्र सैनिकांनी स्वयंशिस्तीने पार पाडला. या उपक्रमामध्ये अंडर ऑफिसर गीता नेवशे, अंजली शेटे, किरण गोरे, हरी नन्नवरे, विठ्ठल अनारसे, वर्षा पंडित, कल्याणी बोरा, दीपाली गावडे, निकिता देशमुख, कल्याणी वाघमोडे व इतर सर्व एनसीसी कॅडेट यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येकाने आपापल्या भागांमधील उपयुक्त असणाऱ्या कडुनिंब, चिंच, गुलमोहर, सुबाभूळ, एरंड, आंबा, सीताफळ यांसारख्या झाडांच्या बिया गोळा करून पर्यावरण दिनी योग्य त्या ठिकाणी लावल्या.

मेजर संजय चौधरी यांनी कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. या उपक्रमासाठी छात्र सैनिकांना ऑनलाईन प्रशिक्षण व माहिती मेजर चौधरी यांनी दिली. पर्यावरण दिनी हा वेगळा उपक्रम राबवित असल्याबद्दल आम्हांला एनसीसी विभागाचा सार्थ अभिमान आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी व्यक्त केले. एनसीसीने वेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदविला असून त्यामध्ये दादा पाटील महाविद्यालयाने केलेला हा प्रयत्न राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असे मत सतरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर जीवन झेंडे यांनी व्यक्त केले. झेंडे, एडम ऑफिसर विनय बाली, सुभेदार मेजर लोकेंद्र सिंग, सुभेदार सचंद्रसिंग तसेच राजेंद्र फाळके, आमदार रोहित पवार, अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, काकासाहेब निंबाळकर यांनी एनसीसी विभागाचे व उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

---------

फोटो - ०७एनसीसी १,२,३

दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी पथकामधील छात्र सैनिकांनी मेजर संजय चौधरी यांच्या संकल्पनेतून पर्यावरण दिनी २१ हजार उपयुक्त बियांचे रोपण वेगवेगळ्या भागात केले.

Web Title: NCC students planted 21,000 seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.