निसर्ग हाच माेठा गुरू आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:09+5:302021-06-09T04:27:09+5:30
निसर्ग हाच मोठा गुरू आहे. त्याने मानवाला त्याच्या पद्धतीने जगायला शिकवले, असे प्रतिपादन महानंदाचे व संगमनेर तालुका सहकारी दूध ...

निसर्ग हाच माेठा गुरू आहे
निसर्ग हाच मोठा गुरू आहे. त्याने मानवाला त्याच्या पद्धतीने जगायला शिकवले, असे प्रतिपादन महानंदाचे व संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दूध संघाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संघाचे ज्येष्ठ संचालक बाजीराव खेमनर, जी.एस. शिंदे, डॉ. प्रमोद पावसे यांच्यासह दूध संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भयानक दुष्काळ, पावसाची कमतरता व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. हा सर्व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. यावर मात करण्यासाठी सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने आता लोकचळवळ ठरले आहे, असेही देशमुख म्हणाले.