लोणी हवेलीत घडला नैसर्गिक चमत्कार
By Admin | Updated: May 9, 2016 23:46 IST2016-05-09T23:16:43+5:302016-05-09T23:46:18+5:30
विनोद गोळे ल्ल पारनेर जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअर बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ बोअरचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक बंद बोअरमधून खळाखळा

लोणी हवेलीत घडला नैसर्गिक चमत्कार
विनोद गोळे ल्ल पारनेर
जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअर बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ बोअरचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक बंद बोअरमधून खळाखळा पाणी वाहू लागले़ या बोअरच्या पाण्याने विहिरीही भरल्याचा चमत्कार पारनेर तालुक्यातील लोणी हवेली हे गाव गेल्या चार दिवसांपासून अनुभवत आहे़ ऐन दुष्काळात खळाखळा वाहते पाणी पाहण्यासाठी बघ्यांची येथे गर्दी होत आहे़
पारनेर शहरापासून सात कि़ मी. अंतरावर असणाऱ्या लोणी हवेली गावाने सर्वाधिक बंधारे बांधल्याने तेथे पाणी टंचाई कमी आहे. लोणी हवेलीतील खडकवाडी भाग परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरचे पाणी जानेवारीतच संपल्याने कांदा पाण्याअभावी वाळून गेला. सध्या सगळ्यांच्या जमिनी पडीक आहेत. त्या परिसराला गावातील विहिरीतून पाणी मिळावे म्हणून उपसरपंच संजय कोल्हे पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करीत होते. पण गुरुवारी खडकवाडी परिसरातील राजेंद्र सीताराम सोंडकर यांना स्वत:च्या बोअरमधून पाण्याचा खळखळ आवाज ऐकू आला़ त्यांनी बोअर सुरू केला तर चक्क बंद पडलेल्या बोअरमधून मोठ्या प्रमाणात पाणी आले. सलग आठ तास बोअर चालल्यानंतर त्यांची विहिरही तुडुंब भरली. ही माहिती समजताच सरपंच सुभाष दुधाडे, उपसरपंच संजय कोल्हे, दादाभाऊ कोल्हे, ग्रामसेवक सुनील दुधाडे, शरद कोल्हे, बाजीराव दुधाडे, अशोक दुधाडे, योगेश कोल्हे, निलेश वाखारे यांच्यासह अनेकांनी खडकवाडी गाठली. राजेंद्र सोंडकर यांच्या बोअरमधून दीड इंचापर्यंत पाणी वाहत होते़ त्यांच्याच शेजारील सोपान तुकाराम कोल्हे, भास्कर विठ्ठल कोल्हे, सागर बाजीराव कोल्हे,जयराम सोनु कोल्हे,दिनानाथ त्रिंबक कोल्हे,पोपट माधव कोल्हे,राजेंद्र सिताराम कोल्हे, तुकाराम नामदेव कोल्हे,माधव कोल्हे यांच्या बोअरलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे़ आम्ही दिवसभर बोअर चालू ठेवले आहेत तरी पाणी बंदझालेनाही,असे सागर कोल्हे यांनी सांगीतले.
हे पाणी आले कोठून?
लोणी हवेलीच्या खडकवाडी परिसराला हंगा तलावाचा फुगवटा आहे. तेथील पाण्याचे झरे मोकळे झाल्याने पाणी येत असेल, असा अंदाज सरपंच सुभाष दुधाडे यांनी व्यक्त केला़ परंतु जानेवारीतच या सर्व बोअरचे पाणी कसे गेले, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नक्की पाणी आले कोठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़