राष्ट्रवादी ओबीसी विभागाने केली चिनी साहित्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 17:26 IST2017-08-24T17:26:32+5:302017-08-24T17:26:39+5:30

अहमदनगर : राष्ट्रवादी ओबीसी विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकात चिनी साहित्याची होळी करण्यात आली. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले

Nationalist OBC Department organized Holi of Chinese literature | राष्ट्रवादी ओबीसी विभागाने केली चिनी साहित्याची होळी

राष्ट्रवादी ओबीसी विभागाने केली चिनी साहित्याची होळी

ठळक मुद्दे चिनी माल वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

अहमदनगर : राष्ट्रवादी ओबीसी विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकात चिनी साहित्याची होळी करण्यात आली. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. चीनी मालावर बहिष्कार टाकून चीनला भारताकडून होणा-या नफ्याने आर्थिक कमकुवत करण्यासाठी चिनी माल वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

होळीमध्ये चिनी लायटिंग, वायर, खेळणे आदी साहित्य टाकण्यात आले होते. यावेळी देशभक्तीवर घोषणांनी देत चीनचा निषेध करण्यात आला. भारतातील ४० टक्के बाजारपेठ चिनी मालाने काबीज केली आहे. चीन आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर माल विकून पैसा कमावत आहे. भारताशी लढण्यासाठी चिनी सैन्य एकत्र येत आहेत. एकीकडे देशात माल विकून पैसा कमवायचा त्याच पैशाचा वापर त्याच देशाच्या विरोधात करायचा ही निती हाणून पाडण्यासाठी होळी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, स्वप्नील खरात, अनिकेत येमूल, संदीप अवचिते, अक्षय बनसोडे, अतुल मेठ उपस्थित होते.

Web Title: Nationalist OBC Department organized Holi of Chinese literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.