राष्ट्रवादी आमदाराचा पुतळा जाळला; पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक
By Admin | Updated: May 15, 2017 15:19 IST2017-05-15T15:19:59+5:302017-05-15T15:19:59+5:30
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले़ तसेच तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे़

राष्ट्रवादी आमदाराचा पुतळा जाळला; पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक
आॅनलाईन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १५ - कुकडी प्रकल्पाच्या १३२ जोड कालव्याखालील लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्याने संतप्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांच्या पुतळ्याचे दहन केले़ तसेच तहसील कार्यालयाला टाळे ठोकले आहे़ त्यानंतर पोलिसांनी भाजपाच्या १५ कार्यकर्त्यांना अटक केली असून यामध्ये भाजपाचे नगरसेवक सुनिल वाळके, गोरख आळेकर आदींचा समावेश आहे़
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी पोलीस ठाणे गाठून भाजपाच्या नगरसेवक व इतर कार्यकर्त्यांवर कठोर करावाई करण्याची मागणी केली़ तसेच १३२ जोड कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी न मिळण्यास भाजपच जबाबदार असून असल्याचा आरोप केला़ याबाबत राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना निवेदन दिले आहे़