राष्ट्रवादी नगरसेवकाला अटक

By Admin | Updated: May 11, 2016 23:59 IST2016-05-11T23:53:25+5:302016-05-11T23:59:24+5:30

अहमदनगर : मुकुंदनगर भागात सात महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान बुधवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शरण आला.

Nationalist corporator arrested | राष्ट्रवादी नगरसेवकाला अटक

राष्ट्रवादी नगरसेवकाला अटक

अहमदनगर : मुकुंदनगर भागात सात महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान बुधवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शरण आला. त्याला पोलिसांनी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
मुकुंदनगर-दर्गादायरा परिसरात १५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटात वाद झाले होते. या चकमकीत ‘अंडा गँग’ने केलेल्या गोळीबारात शरीफ नौशाद हा तरुण जखमी झाला होता. त्याच्या हाताच्या पंजातून गोळी आरपार गेली होती. मुकुं दनगर व दर्गादायरा येथील दोन गटांत अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती.त्याचे पर्यावसान या भांडणात झाले होते. या घटनेनंतर मुकुंदनगर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी जखमी नौशाद याने दिलेल्या फिर्यादीनुसार समद खानविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. समद खान हा मुकुंदनगर परिसरातील नगरसेवक असून तो महापालिकेच्या स्थायी समितीचा सदस्य आहे.
बुधवारी दुपारी त्याला प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी केली आहे. समद खान अनेक दिवसांपासून फरार होता. समद खान याच्या अटकेची कारवाई पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार अहिरे यांनी केली. (प्रतिनिधी)
स्वत:हून झाला पोलीस ठाण्यात हजर
नगरसेवक समद खान नोव्हेंबर २०१५ पासून फरार होता़ महापालिकेच्या अनेक सभांमध्येही तो गैरहजर होता़ विधान परिषद निवडणुकीवेळी तो मतदानासाठी येईल, या अपेक्षेने पोलिसांनी त्याची दिवसभर प्रतिक्षा केली होती़ मात्र, तो आलाच नाही़ समद खान बुधवारी सकाळी दहा वाजता कॅम्प पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.

Web Title: Nationalist corporator arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.