नाशिकचा कांदा कोपरगाव समितीत
By Admin | Updated: August 24, 2016 00:40 IST2016-08-24T00:13:32+5:302016-08-24T00:40:45+5:30
कोपरगाव : लासलगावच्या बाजारात कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव

नाशिकचा कांदा कोपरगाव समितीत
कोपरगाव : लासलगावच्या बाजारात कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळू लागल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणला. त्यामुळे एकाच दिवसात सुमारे २० हजार कांदा गोण्यांची आवक झाली.
लासलगाव बाजार समितीमध्ये खुल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला कांदा परत न्यावा लागला. मात्र कोपरगाव बाजार समितीत किमान २०० ते कमाल ९०० रूपयांचा भाव असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. त्यामुळे दिवसभरात व्यापारी ऋषिकेश सांगळे, आप्पासाहेब सांगळे, मोहसीन रियाज अहमदखान, तेजमल धाडीवाल, महेंद्रकुमार ठक्कर या व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी केला.
चांगल्या प्रतिच्या कांद्याला सुमारे १ हजार रूपये क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
(प्रतिनिधी)