शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

नगरमध्ये राष्ट्रवादी, भाजपाच्या तीन आमदारांवर खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 06:19 IST

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी आ. संग्राम जगताप व इतर काही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हत्येच्या प्रकारानंतर अहमदनगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शिवसेनेने रविवारी जिल्हा बंद पाळला.>पोलीस स्टेशनची तोडफोडआ. संग्राम जगताप यांना अटक केल्यानंतर, शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली़ पोलिसांनी लाठीमार करत, २२ जणांना अटक केली़ त्यांना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.सेनेचे तीन मंत्री शहरात दाखलपर्यावरणमंत्री रामदास कदम व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी नगरला येऊन घटनेची माहिती घेतली. हत्येची जबाबदारी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असेही कदम म्हणाले, तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोघा शिवसैनिकांवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.मारेकरी हजर मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ शनिवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला़ त्याने हत्येची कबुली दिली़