नंदकुमार दुधाळ यांनी केला तरुणांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:46+5:302021-08-20T04:25:46+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारी एक वाजता मुळानगर येथे चमेली अतिथिगृहाच्या मागील बाजूला मुळा धरणाच्या पाण्यात दुर्घटना घडली होती. ...

Nandkumar Dudhal felicitated the youth | नंदकुमार दुधाळ यांनी केला तरुणांचा सत्कार

नंदकुमार दुधाळ यांनी केला तरुणांचा सत्कार

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारी एक वाजता मुळानगर येथे चमेली अतिथिगृहाच्या मागील बाजूला मुळा धरणाच्या पाण्यात दुर्घटना घडली होती. राहुरी शहरातील वैशाली हॉटेलमधील कामगार रावसाहेब भीमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) व बिरेंदरसिंग रावत (मूळ रा. उत्तराखंड, हल्ली रा. राहुरी) धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जवळच मासेमारी करणारे तरुण मदतीला धावले. रावत यांना विकास गंगे व इंद्रजित गंगे यांनी वाचविले; परंतु मते पाण्यात बुडाले. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता मते यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात सापडला. या घटनेत मदतीला धावलेले विकास गंगे, इंद्रजित गंगे, सलीम शेख, अशोक गायकवाड, कैलास बर्डे, किशोर पवार, सुरेश बर्डे, सुमित पलघडमल, साहिल शेख यांचा पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सत्कार केला. पोलीस कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, कॉन्स्टेबल संजय जाधव, सचिन ताजने, पाखरे आदी उपस्थित होते.

Web Title: Nandkumar Dudhal felicitated the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.