शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

नेवासा बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील, उपसभापती नवथर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 17:04 IST

नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार शंकरराव गडाख गटाने सर्व १८ जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते.         

नेवासा (जि. अहमदनगर) : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नंदकुमार पाटील तर उपसभापतीपदी नानासाहेब नवथर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार शंकरराव गडाख गटाने सर्व १८ जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते.        सोमवारी निवडणुक निर्णय अधिकारी गोकुळ नांगरे यांच्या उपस्थित निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी नंदकुमार पाटील तर उपसभापती पदासाठी नानासाहेब नवथर यांचे अर्ज दाखल झाले.त्यामुळे दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर आमदार गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार पांडुरंग अभंग व ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख यांच्या हस्ते नवीन पक्षाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.       यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन नवले, अमृत काळे, हरीशचंद्र पटारे, अरुण सावंत, मीराबाई ढोकणे, अरुण शिंदे, संगिता सानप, अश्विनी काळे, सुंदराबाई ढवाण,बाबासाहेब आखाडे, बाळासाहेब दहातोंडे, सुनील धायजे, गणेश भोरे, संतोष मिसाळ, दौलतराव देशमुख, रमेश मोटे यांच्यासह पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगूने, कडूबाळ कर्डिले,तुकाराम नवले उपस्थित होते.       पालकमंत्री विखे यांनी ताकद देवून माजी आमदार मुरकुटे व लंघे यांना या निवडणुकीत अपयश आले. मागील बाजार समितीच्या निवडणुकीपेक्षा आमदार गडाख गटाचे मताधिक्य वाढल्याने सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा आमदार गडाख यांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली आहे.        विरोधांकांनी केलेल्या आरोपाची दखल न घेता आमदार गडाख यांनी मतदाराशी त्यानी थेट संपर्क करत सावंद साधला. जिल्ह्यात व राज्यात मतदारांना सहली,जादूचे प्रयोग असे वेगवेगळे प्रकार झाले पण नेवासा बाजार समिती याला अपवाद ठरली.गडाख यांनी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली अगदी छोट्या गावातून उमेदवार पुढे केले,सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले.गावातील राजकीय वैर मिटवले ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी गावात ग्रामपंचायत,सोसायटी यात दुसऱ्यांना संधी देऊन गावात राजकीय हस्तक्षेप करू नये याचा शब्दच घेतला व निवडून आल्यावर संघटना बांधावी असेही सांगितले.मतदानाच्या आधी चार दिवस भाजपच्या पॅनल मधील उमेदवाराने आमदार शंकरराव यांच्या उपस्थितीत प्रवेश करून मुरकुटे यांना धक्का दिला याची मोठी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांत झाली         पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका असल्याने ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली भाजपच्या उमेदवारी वरून लंघे व मुरकुटे यांच्यात मोठी रस्सीखेच आहे तर गडाख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे निश्तिच आहे. गडाख यांनी आतापासूनच तयारी चालू केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarketबाजार