नानासाहेब जाधव यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:39 IST2021-03-04T04:39:13+5:302021-03-04T04:39:13+5:30
श्रीरामपूर : राष्ट्रीय स्वयंसेवेक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघचालकपदी बेलापूर येथील सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी ...

नानासाहेब जाधव यांची
श्रीरामपूर : राष्ट्रीय स्वयंसेवेक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या संघचालकपदी बेलापूर येथील सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे. प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली आहे.
दर तीन वर्षांनी संघाच्या जिल्ह्यापासून वरील सर्वस्तरावरील संघ चालक पद व अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या निवडणुका होत असतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींचीदेखील निवड होते. कोरोना संकटाने ऑनलाईन घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्वाचित संघ शाखा प्रतिनिधींनी ही निवड केली.
नानासाहेब जाधव यांनी कृषी अभियांत्रिकीमधील एमटेक पदवी प्राप्त केलेली असून, माती आणि पाणी संवर्धनासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते १९८३ ते २०१२ या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मावळ, शिरुर तालुका तसेच जळगाव जिल्हास्तरावर सहा वर्षे त्यांनी काम केले आहे.
-----