शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

नालेसफाईचा बोजवारा!

By admin | Updated: May 30, 2014 01:15 IST

अहमदनगर : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी अजूनही महापालिकेची नालेसफाई मोहीम अटोपली नाही

अहमदनगर : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी अजूनही महापालिकेची नालेसफाई मोहीम अटोपली नाही. छोट्या नाल्यांची सफाई मोहीम थांबली आहे. नालेसफाई नंतर निघालेला गाळ तसाच काठावर टाकला जात आहे. नालेसफाई मोहिमेचा बोजवारा उडाल्याचे चित्र नगर शहरात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. नगर शहरात २० मोठे तर ३० छोटे नाले असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. छोट्या नाल्यांची सफाई माणसांकरवी तर मोठ्या नाल्यांची सफाई ही जेसीबी मशिनच्या सहाय्याने करण्यात येते. २२ एप्रिल ते २२ मे या काळात छोट्या नाल्यांची सफाई खासगी ठेकेदारांकडून कराराने घेण्यात आलेल्या माणसांकरवी करण्यात आली. त्यानंतर करार संपला त्यामुळे ही मोहीम थांबली आहे. महिनाभरात केवळ ६० टक्के नालेसफाई झाल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. पैठणकर यांनीच स्थायी समितीच्या सभेत दिली. मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी चार जेसीबी सुरू आहेत. २० मे पासून मशिनच्या सहाय्याने नालेसफाई सुरू झाली आहे. शहरात २० मोठे नाले आहेत. नालेसफाईनंतर निघणारी घाण काठावर टाकली जाते. लोकवस्तीच्या ठिकाणी मात्र ही घाण दुसरीकडे वाहून नेली जाते. अन्य ठिकाणी ती तशीच काठावर टाकली जात आहे. पावसाळ्यातील पाण्याने ही घाण पुन्हा त्या नाल्यात वाहून जाते. वर्षानुवर्षे महापालिकेची अशीच नालेसफाई मोहीम सुरू आहे. त्याच त्याच नाल्याच्या सफाईसाठी वारंवार खर्च केला जातो. (प्रतिनिधी) नालेसफाई मोहीम उन्हाळ्यात सुरू केली जाते. पावसाळ्यापूर्वी ती संपणे अपेक्षित असते. पण महापालिकेची नालेसफाई मोहीम जूनच्या अखेरीस संपेल अशी माहिती सूत्रांनी दिली. पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्यानंतर महापालिकेची तारांबळ उडते. त्यापूर्वी दक्षता घेतली जात नाही. गतवर्षी झालेली सफाई मोहीम संशयाच्या भोवर्‍यात सापडली होती. सभागृहात तो विषय चांगलाच गाजला होता. यंदा मात्र प्रशासनाने काळजी घेतली आहे.