नागपुरी संत्री, मोदीच प्रधानमंत्री!
By Admin | Updated: September 30, 2024 14:52 IST2014-05-14T23:17:48+5:302024-09-30T14:52:11+5:30
अहमदनगर : ‘अबकी बार मोदी सरकार’ या घोषणेने सर्वसामान्यांनाही इतके वेड लागले आहे की आता घरघर मोदींचा जप सुरु आहे.

नागपुरी संत्री, मोदीच प्रधानमंत्री!
अहमदनगर : ‘अबकी बार मोदी सरकार’ या घोषणेने सर्वसामान्यांनाही इतके वेड लागले आहे की आता घरघर मोदींचा जप सुरु आहे. सोशल मीडियावर तर ना-ना प्रकारे मोदींचीच चर्चा आहे. काही उत्साही मंडळींनी तर मोदींच्या पंतप्रधानपदाचे उखाणेच घ्यायला सुरुवात केली आहे. व्हाटस् अॅपवर फिरत असलेले काही उखाणे- मोदी जिंकणार, राहुल पडणार देशात चर्चा सुरु शरदरावांची शपथ घेते मोदींनाच पंतप्रधान करु संत्र्यात संत्री, नागपुरची संत्री शरदरावांचे नाव घेते मोदीच होणार प्रधानमंत्री नवरत्नांनी सजला अकबराचा दरबार सोनियाबाई लक्षात ठेवा अबकी बार मोदी सरकार काँग्रेसच्या राजवटीत देश झाला भकास मोदींना करा पंतप्रधान देशाचा होईल विकास या उखाण्यामध्ये मोदींचा गजर करतानाच शरद पवार यांचीही भविष्यात मोदींना साथ तर नसेल ना? याबाबत राजकीय भाष्यही करण्यात आले आहे. भाजपने यावेळी प्रचारतंत्राचा व सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मोदी प्रधानमंत्रीपदासाठी कधीचेच बाशिंग बांधून उभे आहेत. म्हणून असे उखाणेही सुरु आहेत.