लोकमतच्या ‘उमंग’ला नगरकरांचा प्रतिसाद

By Admin | Updated: August 24, 2014 02:06 IST2014-08-24T02:03:13+5:302014-08-24T02:06:01+5:30

अहमदनगर : ‘लोकमत’तर्फे ‘जागतिक छायाचित्र दिना’च्या निमित्ताने आयोजित छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाला शनिवारी प्रारंभाच्या दिवशीच नगरकर रसिकांनी प्रतिसाद दिला.

Nagarkar's response to Lokmat's 'Umang' | लोकमतच्या ‘उमंग’ला नगरकरांचा प्रतिसाद

लोकमतच्या ‘उमंग’ला नगरकरांचा प्रतिसाद

अहमदनगर : ‘लोकमत’तर्फे ‘जागतिक छायाचित्र दिना’च्या निमित्ताने आयोजित छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाला शनिवारी प्रारंभाच्या दिवशीच नगरकर रसिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
नगर-पुणे महामार्गावरील ओम गार्डन येथे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करुन प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. यावेळी मराठा चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या नगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, सुप्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया, श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कॉ-आॅप अर्बन क्रेडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे, ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार, नगरसेविका सुवर्णा जाधव, समर्थ डिजीटल लॅबचे नरेश कांबळे, वृत्तछायाचित्रकार राजू शेख, दत्ता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी ‘लोकमत’च्या या प्रयत्नांचे स्वागत केले. पारगावकर म्हणाले, छायाचित्रण कला आंतरबाह्य बदलली. नवे तंत्रज्ञान आले. मात्र उत्तम छायाचित्र काढण्यासाठी लागणारी कल्पकता नसेल, तर छायाचित्र सजीव होत नाही. प्रदर्शनातील अनेक छायाचित्रे अशीच मनोवेधक आहेत. छायाचित्र विक्रीच्या देणगीतून सामाजिक संस्थेच्या मदतीचा हेतू स्वागतार्ह आहे. नरेंद्र फिरोदिया यांनीही सहभागी छायाचित्रांना मनापासून दाद दिली. ते म्हणाले, नगर शहर आणि आजुबाजूच्या परिसराचे वैभव या छायाचित्रांमधून नजरेत भरते. या प्रदर्शनाला असलेला सामाजिक दृष्टीकोन त्याचे महत्व अधोरेखित करणारा आहे. यावेळी त्यांनी छायाचित्रे खरेदी करुन छायाचित्रकरांचा उत्साह वाढविला.
दरम्यान, दिवसभर छायाचित्र रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रकारांचा उत्साह वाढविला. रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Nagarkar's response to Lokmat's 'Umang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.