शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नगरने काँग्रेसला दिले तीन प्रदेशाध्यक्ष; मुख्यमंत्रीपदाची अद्याप प्रतिक्षाच

By सुधीर लंके | Updated: July 14, 2019 05:12 IST

बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

- सुधीर लंके अहमदनगर : बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यापूर्वी एस.एम.आय. असीर व गोविंदराव आदिक यांना ही संधी मिळाली होती. नगर जिल्ह्यात थोरात यांच्यासह आठ नेत्यांनी आजवर विविध पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. यापूर्वी नगरचे एस.एम.आय. असीर हे १९८३ साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. २००० ते२००३ या काळात श्रीरामपूरचे गोविंदराव आदिक यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसची धुरा सांभाळलीहोती. नगर जिल्ह्याचे सुपूत्र असलेले दिवंगत माजी मंत्री दादासाहेब रुपवते हे समांतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तर दिवंगत बाळासाहेब विखे यांनी महाराष्टÑ समाजवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती. बबनराव ढाकणे हे जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते.असीर, रुपवते, ढाकणे व विखे हे एकाच कालखंडात विविध पक्षांचे प्रमुख होते. राष्टÑवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर बबनराव पाचपुते व मधुकर पिचड यांना या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळालेली आहे.नगर जिल्हा हा मात्तबर नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्रीपदाची संधी या जिल्ह्याला आजवर मिळाली नाही. थोरात यांचे काँग्रेसमध्ये दिल्लीदरबारी वजन वाढले आहे. राहुल गांधी यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.राधाकृष्ण विखे यांची गत पाच वर्षांत भाजपशी जवळीक वाढली होती. त्याचवेळी काँग्रेसने थोरात यांना केंद्रीय समितीवर घेत त्यांच्याकडे पक्षाचे पुढील नेतृत्व जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्त्वात बदल करीत थोरात यांना पक्षाध्यक्षपदाची संधी दिली.>थोरात-विखे संघर्ष कायम?विखे यांना भाजपने मंत्रिपद दिले.दुसरीकडे काँग्रेसने थोरात यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे नगर जिल्हा व राज्यात आगामी काळातही थोरात-विखे हा संघर्ष कायम राहील. थोरात हे संयमी नेते म्हणून ओळखले जातात. समविचारी पक्षांची ते कशी मोट बांधतात, याची प्रतीक्षा राहील. राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे चांगले संबंध आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील