नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी किरकोळ प्रकार वगळता ६५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:41 IST2021-01-15T17:17:36+5:302021-01-15T17:41:56+5:30
नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे एका मुख्याध्यापकाला झालेली मारहाण ही घटना वगळता मतदान उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पडले.

नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी किरकोळ प्रकार वगळता ६५ टक्के मतदान
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी दुपारी साडेचार वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे एका मुख्याध्यापकाला झालेली मारहाण ही घटना वगळता मतदान उत्साहात व शांततापूर्ण वातावरणात पडले.
जिल्ह्यातील राळेगणसिध्दी, हिवरेबाजार, लोहसरसह आदर्श गावात नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जिल्ह्यात २५ टक्के मतदान झाले होते. नगर तालुक्यातील डोंगरगण येथे वृध्द आईला मतदान केंद्रावर घेऊन जाणा-या मुख्याध्यापकाला सहायक पोलीस निरीक्षकाकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला. ही घटना वगळता जिल्ह्यात सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेक गावात मोठा फौजफाटा तैनात केला होता. नागरिकात सकाळपासून मतदानासाठी उत्साह दिसून येत होता.