नगर जिल्ह्यात ३३३ जनावरे वाहून गेली, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:37+5:302021-09-02T04:44:37+5:30

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील पुरात एक जण पुरात बेपत्ता झाला होता. मुरलीधर आनंदराव सागाडे (रा. वडुले. ता. शेवगाव) असे ...

In Nagar district, 333 animals were carried away and one died | नगर जिल्ह्यात ३३३ जनावरे वाहून गेली, एकाचा मृत्यू

नगर जिल्ह्यात ३३३ जनावरे वाहून गेली, एकाचा मृत्यू

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील पुरात एक जण पुरात बेपत्ता झाला होता. मुरलीधर आनंदराव सागाडे (रा. वडुले. ता. शेवगाव) असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, सोमवारच्या पुरात शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ३३ जनावरे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

शेवगाव तालुक्यात सोमवारी रात्री ८५ मि.मी. तर पाथर्डी तालुक्यात १९८ मि.मी. इतका पाऊस झाला. या पावसामुळे शेवगाव तालुक्यात २०५, तर पाथर्डी तालुक्यात १२८ जनावरे वाहून गेली आहेत. नुकसान झालेली पिके आणि घरांच्या पडझडीबाबत दोन दिवसात पंचनामे करण्याचा आदेश दिला असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्म्साठी ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले असून त्यांना शेजारील गावांमधील शाळा, मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले होते. यासाठी एनडीआरएफ आणि औरंगाबाद येथील प्रशासनाच्या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

Web Title: In Nagar district, 333 animals were carried away and one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.