नगर जिल्ह्यात एकाच दिवसात २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले; नगर शहरातील २४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:47 IST2020-06-26T18:46:51+5:302020-06-26T18:47:13+5:30
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यातील २४जण नगर शहरातील आहेत.

नगर जिल्ह्यात एकाच दिवसात २८ कोरोना पॉझिटिव्ह आढळले; नगर शहरातील २४ रुग्ण
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यातील २४जण नगर शहरातील आहेत.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयाकडून आलेल्या अहवालात हे २८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात नगर शहरातील सिद्धार्थनगर भागात ६, वाघगल्ली नालेगाव भागात ४, तोफखाना भागात १२ व सिव्हील हडको भागात २ रूग्ण आढळले.
याशिवाय कर्जतमध्ये २, जामखेड तालुक्यातील जवळके येथे १, तर शिर्डी येथे १ पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान जिल्ह्यात सध्या अॅक्टिव रूग्णांची संख्या १०५ झाली असून २६५ जण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी बापूसाहेब गाडे यांनी दिली.