शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील तरुणाच्या हत्येचे गूढ उकलले: डॉक्टर असलेला भाऊच निघाला आरोपी; कसा झाला उलगडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:06 IST

सुरुवातीला हे प्रकरण वेगळे असल्याचा संशय होता. परंतु, चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला.

Ahilyanagar Crime : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दारू पिऊन आई व स्वतःच्याच मुलाला मारहाण करत असल्याने डॉक्टर असलेल्या सख्ख्या भावानेच त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अशोक रामराव पाठक असं अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमनाथ रामराव पाठक यांचा मृतदेह सोमवारी सकाळी संत्र्यांच्या शेतात आढळून आला होता. मयत झालेला सोमनाथ याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो आई व स्वतःच्या मुलाला सतत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत असे. रविवारी डॉक्टर असलेला भाऊ त्याला समजावून सांगण्यासाठी सातवडला गेला होता. त्याच्यासमोरच सोमनाथ याने आई व स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या रागातून डॉक्टरने सोमनाथ याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सोमनाथ हा संत्र्यांच्या शेतात पळाला. 

डॉक्टरने पाठलाग करत पकडून त्याला संत्र्याच्या झाडाला बांधले. त्याची हालचाल थांबल्याने डॉक्टर तेथून निघून गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉक्टरचा शोध घेऊन त्याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले आदींच्या पथकाने केली.

आईला दिसला मृतदेहमयत सोमनाथ यांच्या आई सिंधूताई पाठक या सोमवारी पहाटे मोटार चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना मुलाचा मृतदेह संत्र्याच्या शेतात दिसला. त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेर यांनी घटनास्थळी भेट देता गुन्ह्याचा छडा लावला.

भावाला लागले दारूचे व्यसनडॉक्टरने भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासमोरच भावाने स्वतःच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मयताचेही मेडिकल होते. परंतु, त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघा भावांमध्ये वारंवार वाद व्हायचे. भाऊ दारू सोडायला तयार नव्हता. यातूनच डॉक्टरने भावाला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

असा झाला खुनाचा उलगडापोलिस निरीक्षक आहेर यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास केला. सुरुवातीला हे प्रकरण वेगळे असल्याचा संशय होता. परंतु, चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मयताचा भाऊ डॉक्टरला ताब्यात घेतले. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस