गावचा विकास करणे हेच माझे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:30+5:302021-07-29T04:22:30+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले. या वेळी आ. पाचपुते म्हणाले ...

My goal is to develop the village | गावचा विकास करणे हेच माझे ध्येय

गावचा विकास करणे हेच माझे ध्येय

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले. या वेळी आ. पाचपुते म्हणाले की, कविता चंदन उखलगावच्या सरपंच झाल्याबरोबर त्यांनी गावातील विकासकामे मार्गी लागावेत यासाठी माझ्याकडे तगादा लावला. उखलगावकरांनी मला सतत साथ केलेली आहे. त्यामुळे या गावचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे कायम सहकार्य राहील. याठिकाणी उखलगाव-रांजणगाव अर्धा किलोमीटर, उखलगाव-वाळकेमळा अर्धा किलोमीटर, उखलगाव-सुरेगाव एक किलोमीटर या रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कुकडीचे माजी संचालक सुभाष वाळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनकर पंदरकर, संदीप नागवडे, उपसरपंच धनंजय लाकूडझोडे, प्रा. संजय लाकूडझोडे, दत्तात्रय जगताप, मोहन चंदन, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------

फोटो - २८विसापूर

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले.

Web Title: My goal is to develop the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.