माझं क्षेत्र वेगळं़़़ त्याचं काम आभाळाएवढं !
By Admin | Updated: November 6, 2016 00:47 IST2016-11-06T00:25:59+5:302016-11-06T00:47:49+5:30
अहमदनगर : सदाशिव आणि माझ्या वयात अवघे दोन वर्षांचे अंतऱ़त्याला लहानपणापासूनच कला आणि नाट्यक्षेत्राचे मोठे आकर्षण़़़मला मात्र,

माझं क्षेत्र वेगळं़़़ त्याचं काम आभाळाएवढं !
अहमदनगर : सदाशिव आणि माझ्या वयात अवघे दोन वर्षांचे अंतऱ़त्याला लहानपणापासूनच कला आणि नाट्यक्षेत्राचे मोठे आकर्षण़़़मला मात्र, व्यवसायाची आवड़ दोघांचे कामाचे क्षेत्र वेगवेगळे़़ आवडनिवड वेगळी असली तरी आम्ही एकाच झाडाच्या दोन फांद्या होतो़ अभिनयासह जनसामान्यांत राहुन त्याने केलेले काम व्यापक आहे़ सदाशिव आमच्यातून निघून गेल्यानंतर त्याच्यासाठी हजारोंनी आश्रू ढाळले़ यातूनच सदाशिव किती जणांच्या मनात रुजला होता याची प्रचिती येते़ असे सांगत दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदशिव अमरापूरकर यांच्या आठवणींना त्यांचे कनिष्ठ बंधू राजाभाऊ अमरापूरकर यांनी उजाळा दिला़
अमरापूरकर यांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात तसेच कला व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक काम करण्याच्या उद्देशाने अमरापूरकर कुटुंबीय व त्यांच्या चाहत्यांनी स्थापन केलेल्या सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टचे शनिवारी उद्घाटन झाले़ यावेळी राजाभाऊ यांच्यासह अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर, खा़ दिलीप गांधी, चेतना सिन्हा व सुमित्रा भावे यांनी अमरापूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला़ अमरापूकरांविषयी सांगताना राजाभाऊ म्हणाले, सदाशिव गेल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी मुंबई येथे सुताराचे काम करणारा एक व्यक्ती नगर येथे आमच्या घरासमोर येऊन रडत होता़ त्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, तात्या मुंबईत जेव्हा शूटिंगसाठी यायचे तेव्हा ते माझ्यासमवेत बसून निवांत गप्पा मारत असे़ माझे सुख-दु:ख ते विचारायचे, त्यांचा मोठा आधार वाटत होता़ सदाशिवच्या याच आठवणी कायम स्मरणात राहाव्यात या उद्देशातून ही ट्रस्ट स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले़ सुनंदा अमरापूरकर म्हणाल्या, अमरापूरकर यांच्या सानिध्यात आलेले माणसे त्यांना कधी विसरणार नाहीत़ त्यांची आठवण कायम ठेवण्यासाठी ट्रस्टची स्थापना केली असून, या माध्यमातून कला आणि सामाजिक क्षेत्राशी निगडित विविध उपक्रम राबविण्याचा उद्देश आहे़ याचाच एक भाग म्हणून त्यांच्या नावे स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले़ सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी अमरापूरकर यांच्या आठवणींना उजाळा देत ‘ग्रामीण स्त्रीचे सबलीकरण’ या विषयावर व्याख्यान दिले़ सुमित्रा भावे यांनीही अमरापूरकर यांच्या आठवणींना उजाळा देत साहित्य आणि कला क्षेत्राविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाला महापौर सुरेखा कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, डॉ़ उमा कुलकर्णी, विनोद शिरसाठ, रिमा अमरापूरकर, डॉ़ आनंद नाडकर्णी यांच्यासह अमरापूरकर यांचे चाहते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)