संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:36+5:302021-07-02T04:15:36+5:30

वाळकी : न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ...

Music teacher Balasaheb Waikar's honor | संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा गौरव

संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा गौरव

वाळकी : न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे होते.

वाईकर यांनी न्यू आर्ट्स, कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये संगीत शिक्षक म्हणून १९ वर्षे सेवा केली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई येथे ही संगीत शिक्षक म्हणून सेवा केली आहे. कलारत्न, वीर जीवा महाले, भजन सम्राट, अभिनव अभंग, ज्ञान भूषण आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. गायनातील संगीत अलंकार ही उच्च पदवी त्यांनी प्राप्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, उपप्राचार्य भाऊसाहेब कचरे, संस्था निरीक्षक तात्यासाहेब भापकर यांनी वाईकर यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रा. उद्धव उघले यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक कल्पना दारकुंडे यांनी आभार मानले.

----

०१ नगर वाईकर

न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संगीत शिक्षक बाळासाहेब वाईकर यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करताना प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, उपप्राचार्य भाऊसाहेब कचरे व इतर.

Web Title: Music teacher Balasaheb Waikar's honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.