संगीत तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 09:01 IST2021-05-16T09:01:19+5:302021-05-16T09:01:53+5:30

  अहमदनगर : येथील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, संंस्कृतचे  अभ्यासक डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.  महाकवी ...

Music expert Dr. Madhusudan Bopardikar passed away | संगीत तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांचे निधन

संगीत तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांचे निधन

 

अहमदनगर : येथील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, संंस्कृतचे  अभ्यासक डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. 

महाकवी कालिदास,  राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक पुरस्काराने  त्यांना गौरविण्यात आले होते. बंदिश सांगितिक अकादमीच्या माध्यमातून त्यांनी नगरमध्ये संगीत चळवळ उभारली. त्यांनी अनेक शिष्य घडवले. संवादिनी वादनात त्यांचा सखोल अभ्यास होता. याच माध्यमातून त्यांनी संगीताचे हजारो प्रयोग केले. येथील पेमराज सारडा महाविद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते.

Web Title: Music expert Dr. Madhusudan Bopardikar passed away