‘गाता रहे’तर्फे संगीत मैफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:29+5:302021-09-10T04:27:29+5:30
अहमदनगर : ‘गाता रहे मेरा दिल ग्रुप’च्या वतीने गायिका आशा भोसले यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त रहमत सुलतान सभागृह येथे ...

‘गाता रहे’तर्फे संगीत मैफील
अहमदनगर : ‘गाता रहे मेरा दिल ग्रुप’च्या वतीने गायिका आशा भोसले यांच्या ८८ व्या जन्मदिनानिमित्त रहमत सुलतान सभागृह येथे आशा भोसले यांनी गायलेली गीतांची ‘एक मैं और एक तू’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीचे ऑनलाइन प्रसारण करण्यात आले. यामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या मैफलीत गुलशन धारणी, दीपा भालेराव, नीता माने यांनी आशा भोसले यांची गीते सादर केली, तर द्वंद्वगीतासाठी अमीन धाराणी, सुनील भंडारी, सुनील हळगावकर, दिनेश मंजरतकर, विकास खरात यांनी साथ दिली. या मैफलीत ‘ये राते ये मौसम नदी का किनारा’, ‘रात के हम सफर’, ‘प्यार जिंदगी है’, ‘तेरे इश्क का मुझ पर हुआ’, ‘तुमसे मिलकर ऐसा लगा तुमसे मिलकर’, ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन’, अशी नावाजलेली अनेक गीते सादर करण्यात आली. सूत्रसंचालन करताना चारुता शिवकुमार यांनी केले.